Saturday, 11 August 2012

The Experiment

This is not i was looking for, i thought i would easily get rid of him but now i think it is almost impossible and his absence is apparently recognisable from far distance. The nature might have provided necessary skills of camouflage but then for survival of my enemy, it must have given perspective to single out the absence.
So now there are four things in the story viz. Nature, enemy,  his absence and me.
Yes the last sentence looks more technical, as we used to write "apparatus required for experiment" in our schooldays.Just the thing is that it has been written in reverse order and conclusion has been drawn ahead.
(P.S.-Again I forgot to put diagram and formula )

Saturday, 16 June 2012

पर्शिअन गालीचा (W. Somerset Maugham)

स्वैर कल्पनेच्या उच्चतम चेतनामय अवस्थेमध्ये  गणितीय प्रात्यक्षिकाच्या संपूर्ण आवेगाने त्याला आत्मज्ञान झाले  की जीवन हे अर्थहीन आहे  त्यावेळी त्याने अशी कल्पना केली  की ;म्हणूनच  क्रोंशोवने  पर्शिअन गालीचा दिला असावा. विणकराने गुंतागुंतीचा नक्षीदार रचनेचा आकृतिबंध विणला होता तो एकमात्र त्याच्या सौंदर्य सदभिरुचीदर्शक सुखासाठी  न की कोणत्या अंतिम हेतू प्रीत्यर्थ ; मनुष्य  पण असाच जीवन व्यतीत करू शकणार नाही काय? जर एखाद्यला असा कुत्रिम विश्वास वाटला की त्याच्या कर्मावर त्याचे नियंत्रण नाहीय तर तो मनुष्य देखील;   त्याच्या जीवनाकडे पाहून; त्याला अशी अनुभूती होणार नाही काय की एक अत्यंत शोभिवंत नक्षीदार आकृतिबंध तयार झाला आहे. ह्या रचनेची किंचितच  गरज आहे आणि त्याची आवश्यकता काहीच नाही. ते त्याने केवळ स्वान्त सुखाय  केलंय. त्याच्या जीवनातील बहुउन्मार्गी घटना , त्याची कर्त्यव्यपूर्ती, त्याच्या भावना, त्याचे  विचार, तो एक संकल्पन तयार करू शकतो , साधारण, अलंकारयुक्त ,जटील किंवा  मनोहर , यद्यपि   निर्वाचानाचे सामर्थ्य  हे एक इंद्रजाल देखील असू शकेल, जरी अस्पष्ट चंद्रकिरण आणि प्रत्यक्ष यांची   विस्मयकारक हस्तलाघवाने  केलेली ती एक अद्भुत गुंफण असू शकेल, असं वाटत होतं आणि त्याच्यासाठी हे असंच होतं जीवनाच्या  विस्तीर्ण   विकृतीमध्ये ( एक नदी जिचा कोणताही उगम नाही आणि अंतहीन असं तिचा प्रवाह जिथे सागर नाही ) सर्व अर्थहीन आहे आणि काहीच महत्वाचं नाहीय या त्याच्या कल्पनेच्या पार्श्वभूमीवर, नक्षीदार आकृतीबंध विणण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगीत धाग्याचे निर्वाचन करण्याचे आत्मसापेक्ष समाधान एखाद्या मनुष्याला मिळणार नाही काय?. असा एक नक्षीदार आकृतीबंध आहे जो की , उघडपणे निःसंदिग्ध आहे , परिपूर्ण आहे, आणि अत्यंत सुंदर आहे ज्यामध्ये मनुष्य जन्मतो, मोठा होतो, विवाह करतो, मुले जन्माला घालतो, पोटाची खळगी भरण्यासाठी परिश्रम करतो आणि मरतो; परंतु बाकीचे ही आहेत, बिकट, किचकट, सूक्ष्म गुंतागुंतीचे आणि विलक्षण ज्यामध्ये सुखाचा अभाव आहे आणि जिथे यशासाठी प्रयासच  केले गेले नाहीत ;  आणि त्यामध्ये क्षुब्ध मोहकता आढळून येऊ शकेल.काहींचं जीवन; जसं की हेवर्डचं, आकृतिबंध अपरिपूर्ण असतानाच अंध- तटस्थ   यदृच्छा खंडित झाली ;अन सांत्वनेच्या  सुखाबद्दल तर उदासीनताच होती; बाकींचे  जीवन; जसं की क्रोंशावचं, त्याने असा आकृतिबंध तयार केला की तो समजण्यास  कठीण आहे,  त्याचं आयुष्यच त्याचं समर्थन होतं हे समजण्यास दृष्टीकोन बदलायला हवा होता आणि प्राचीन मानदंडात फेरफार करायला हवे होते .त्याला असं वाटलं की तो सुखासाठी इच्छेचा त्याग  ह्या  त्याच्या शेवटच्या दृष्टीभ्रमाचा अंत करीत आहे. सुखाच्या फुटपट्टीने त्याचे जीवन मोजले असते तर ते खूपच निष्टुर ठरले असते. पण आता त्याच्यामध्ये  विश्वास यायला लागला जेंव्हा त्याला आकलन झाले की जीवन मोजायला, त्याची किंमत  करायला दुसरे काही हवे होते. सुख हे एक वेदने प्रमाणे आहे. ते येतात , दोघे पण जसे जीवनाचे  बाकीचे तपशील येतात, नक्षीदार आकृतीबंध विस्तारताना. एका क्षणी त्याला असं भासलं  की तो अस्तित्वाच्या आकस्मिक घटनांकडे  तटस्थेने पाहतोय  अन त्याला अशी जाणीव झाली की पूर्वीप्रमाणे त्या घटना पुन्हा त्याला प्रभावित करणार नाहीत. काहीही घडलं तरी आता ती फक्त अजून एक प्रेरणा असली  असती; नक्षीदार आकृतीबंध आणखीन जटील होण्याकरिता  आणि जेंव्हा अंत समीप येईल तेंव्हा कार्यसिद्धीचा तो आनंद घेईल. ही एक कलावस्तू आहे अन ती  खचितच सुंदर असेल कारण तिच्या अस्तित्वाविषयी फक्त त्यालाच जाणीव आहे अन त्याच्या मृत्युनंतर या कलावस्तूचे अस्तित्व देखील संपुष्टात येईल.
तो आनंदित झाला. 

Friday, 8 June 2012

Love and/or Hate

I am in Love

I am in Love with my Life

But it's not only Love Relationship its just Love Hate Relationship

And most of the time I do not Love but I Hate this Relationship

Sunday, 3 June 2012

प्रश्नकर्ता (विल ड्युरांत)

 तो उठला आणि क्रिटो  बरोबर स्नान गृहात गेला आम्हला वाट पहायची आज्ञा करून आणि आम्ही वाट पाहिली विचार करत, बोलत.......  त्या थोर व्यथेची .
आमच्या पित्याला आमच्या कडून हिरावून घेण्यात येत होतं आणि आमचं येणारं जीवन पोरकं होणार  होतं.संध्यासमय निकट येत चालला होता अन तो आत जाऊन बराचसा कालावधी झाला होता.
तो बाहेर आला आणि आमच्यात बसला .... पण मुक्यानेच
तेवढ्यात जेलर  आलाच आणि त्याच्या पुढ्यात उभे राहून म्हणाला
"येथे आलेल्या सर्व व्यक्तींमध्ये तुम्हीच सर्वात उच्च कुलीन अन थोर आहात. मी कोणताच दोष तुमच्या माथी मारणार नाही 
 मी आता येथे माझ्या वरीष्ठांच्या  आज्ञेचे पालन करेन तेंव्हा इतरेजनांचा रोष मला सहन करावा लागेल.मला संपूर्ण खात्री आहे की तुम्ही इतरांचा राग माझ्यावर काढणार नाही .  मी दोषी नाही हे तुम्हाला  ज्ञात आहे.
पण प्रक्रियेचा भाग म्हणून काही गोष्टी तुम्हला सहन कराव्या लागतील."ह्या नंतर  मात्र तो अश्रू आवरू शकला नाही अन त्वरीत वळून जाऊ लागला.
त्याने जेलरकडे पहिले अन म्हणाला, " तुझ्या भावनांचा मी आदर करतो ; तुझ्या आज्ञेचे मी निश्चितच पालन करेन"
नंतर आमच्याकडे वळत तो म्हणाला " किती मनोहर आहे हा मनुष्य, जेंव्हा पासून मी येथील कारागृहात बंदिस्त आहे तो मला नेहमीच भेटायला येत असे....
अन आता त्याला कमालीचा शोक  होत आहे. पण आपणास  मात्र तो म्हणतो तसेच करावे  लागेल . क्रिटो प्याला आणतात का ते पहा बर आणि जर विष अजून तयार केलं नसेल तर करायला सांग ."
"होय," क्रिटो म्हणाला " सूर्य अजून देखील डोंगरमाथ्यावर आहे घोषणा जाहीर झाल्यावर त्याने खाना घेतला आणि तो प्यायला अन आता तो वैषयिक सुखात रममाण झालाय. अजून बराच कालावधी आहे इतकी
घाई नका करू. अजून बराच कालावधी आपल्याकडे आहे."
तो म्हणतो " होय क्रिटो .आणि ज्यांच्या बद्दल तू बोलतो आहेस त्यांचे  असे  वागणे  बरोबरच नाहीय का? त्यांना असं वाटतं की  विलंबाने ते काही प्राप्त करू शकतील परंतु थोड्या विलंबाने विष प्रशन  करून   मी काही प्राप्त करावे असे मला किंचितसे  ही वाटत नाही. ज्या जीवनाचा मी आधीच  त्याग केला आहे ते मला आता वाचवायचं नाही. अन मला ते अत्यंत हास्यास्पद वाटतं. म्हणून  मी म्हणतो तसे कर,  नाकारू नकोस ."
हे ऐकून क्रिटोने सेवकाला खुण केली ; सेवक आत गेला अन काही वेळाने तो बाहेर आला तेंव्हा त्याच्या सोबत जेलर होता व सेवकाच्या हातात विषाचा प्याला होता.
बंदिवान म्हणाला " माझ्या प्रिय  मित्रा तू अनुभवी आहेस  तूच मला  सांगशील  पुढे काय आणि कसे  करायचे  ते?"
मनुष्य म्हणाला " तुम्हला केवळ चालावं लागेल अन जेंव्हा तुमचे पाय जड होतील तेंव्हा आडवे पडा आणि त्यानंतर विष त्याचे काम सुरु करेल"
त्याच वेळेस त्याने विषाचा प्याला बंदिवानाच्या हाती सोपवला. बंदिवानाने तो अगदीच सहजतेने हाती घेतला  त्यावेळी तो फारच शांत होता त्याच्या चेहऱ्यावर कोणतीच चलबिचल न्हवती.
" हा प्याला तू  कोणत्या देवासमोर ठेवला होतास? अन कोणती प्रार्थना केली होतीस? मी काही प्रार्थना करावी काय?"
तो मनुष्य म्हणाला " आम्ही फक्त तयार  करतो अन तितकेच पुरेसे आहे."
"मला समजले."
" तरी देखील मला प्रार्थना करावीच लागेल म्हणजे माझा ह्या विश्वापासुनाचा-- ते  -- त्या विश्वापर्यंतचा प्रवास आधी सुखकर  होईल, म्हणून मला ह्या प्रार्थनेची अनुमती द्यावी. "
मग त्याने विषाचा प्याला ओठास लावला आणि शांत चित्ताने व उल्हासित वृत्तीने त्याने विषाचे प्राशन केले.
येथवर आमच्यापैकी बहुतेकांनी दुःख आवरून धरले होते; पण आम्ही जेंव्हा त्याला प्राशन करताना  पाहिलं आणि त्याने शेवटचा  घोट देखील घेतला तेंव्हा आमाचा शोक अनावर झाला. कितीही रोखून धरले तरीही माझ्या  नकळत अश्रू धारा  वाहू लागल्या अन मी ओंजळीत चेहरा लपवून जोराने स्फुंदू लागलो.निश्चितपणे  मी त्याच्यासाठी अश्रू ढाळत  न्हवतो पण असा सोबती गमावल्याने जे अरिष्ट माझ्यावर येणार होतं त्या विचाराने.मी काही एकटाच न्हवतो क्रिटो ला जेंव्हा अश्रू अनावर झाले तेंव्हा तो उठून दूर  जाऊ लागला मी त्याच्या मागोमाग लाऊ लागलो अन त्याच क्षणी अपोलोडोरस  जो की आधीपासूनच अश्रू ढाळीत  होता त्याने मोठ्याने  आक्रंदन सुरु केले त्यामुळे मग आम्ही सगळेच भेकड वाटू लागलो. फक्त तोच केवळ शांत चित्त राखू शकला होता."
" हा एवढा आकांत कशासाठी?"
"मनुष्याने मरताना शांतता हवी ह्याच कारण साठी मी महिलांना पाठवून दिले होते. शांत राहा पाहू आणि धीर धरा."
आम्हाला हे ऐकून खूप शरम वाटली आणि आम्ही रडायचे थांबलो ; आणि मग पाय जड होईपर्यंत तो चालू लागला , त्याचे पाय थरथरू लागले आणि सूचना  केल्याप्रमाणे तो पाठीवर पडला;
ज्या माणसाने विष दिले होते तो त्याच्या पायाचे आणि  तळव्याचे   निरीक्षण करू लागला ; काही वेळाने त्याने पायावर जोराने दाब दिला आणि विचारले की त्याला काही जाणवते आहे का ; अन तो म्हणाला
 " नाही".
आणि त्याचे पाय हळू हळू वर वर गार आणि ताठर  होत चालले. त्याला ते स्वतःलाच जाणवायला लागलं होतं मग तो म्हणाला " जेंव्हा विष हृदया पर्यंत पोहोचेल तेंव्हाच शेवट येईल"
त्याचा कंबरे पर्यंतचे शरीर गारठून  गेले तेंव्हा त्याने त्याचा चेहरा अनावृत्त केला ( त्याने स्वतःला आच्छादून घेतले होते) अन म्हणाला  त्याचे ते शेवटचे शब्द होते '" क्रिटो, मी आस्क्लेपिअस  ला एक कोंबडा देणे लागतो,  तू उधारी चुकती करायचे ध्यानात ठेवशील काय?" "  ऋण चुकते होईल " क्रिटो म्हणाला "  अजून काही ?" ह्या प्रश्नाचे मात्र कोणतेच उत्तर आले नाही परंतु काही वेळातच हालचाल जाणवली सेवकाने त्याला अनावृत्त केले; त्याचे डोळे उघडेच होते; क्रिटो ने त्याचे डोळे झाकले.
माझ्या मित्राचा शेवट असा झाला ज्याला मी खरोखरीचा अत्यंत विद्वान अन न्यायी समजतो  कोणाहीपेक्षा अधिक खूप अधिक.

Saturday, 2 June 2012

Obsolete Absurd

It is absurd, more absurd than I ever thought.

Then it was only in my brain but now it is encroaching my heart.

Only this much is allowed to express at least as of now.

Saturday, 31 March 2012

रहस्य (Enigma: Albert)


सभोवतालच्या प्रदेशात सूर्याच्या उबेशीर पिवळ्या धमक किरणांच्या तरंगांची वृष्टी होत आहे. त्यांच्या प्रभावाखाली सर्व काही अक्षुब्धपणे वाढत राहते, आणि लुबेरोन पर्वत , त्या तिथला, केवळ मौनाचा एक विशाळ खंड, ज्याला मी अविरतपणे ऐकत राहतो. मी सावध चित्ताने ऐकतो, कोणी दूरवरून माझ्याकडे धावत येत आहे, अदृश्य मित्र मला बोलावत आहेत. माझा हर्ष वाढतो आहे.आणि पुन्हा एकदा गूढ आनंदी रहस्याचे  मला सर्वंकष आकलन होते.
तर मग ह्या विश्वातील अतार्किकता कुठे आहे?हे दैदिप्यमान तेज आहे की त्याच्या उणीवेची आठवण? स्मरणात इतके कोवळे मस्त  उन असताना मी निरर्थक गोष्टींवर पैजा कश्या लावत बसलो? कधी कधी माझ्या भोवतीचे लोक आश्चर्यचकित होतात आणि मी देखील. मी त्यांना सांगू शकतो जसा मी स्वतःलाच सांगतो असतो की खरं तर सूर्य किरणांमुळेच मला ती वाट दिसू शकली आणि त्याचा गडद प्रकाश, विश्व आणि त्याच्या विविध स्वरूपाला नेत्रदीपक तिमिरात साकळवून टाकतो. परंतु हेच आणखीन भिन्न आणि सुलभ शब्दांमध्ये देखील व्यक्त करता येईल अन मला ते आवडेलच. सत्य हे नेहमीच स्पष्ट अन स्वच्छह स्वरूपात प्रकट व्हावयास हवे असं मला वाटतं अन खरं म्हणजे तेच सत्याचे लक्षण आहे. अतार्किकता , मला त्या बद्दल काय वाटते जे मला कोणाही पेक्षा निःसंदेह पणे सूक्ष्म भेदही न करता साध्या सोप्या अन सरळ भाषेत विवरण करता येईल. जर वास्तविकपणे तसंच सांगायचं झालं तर निश्चितपणे पुन्हा आपल्याला सूर्याकडेच परतावे लागेल.
कोणताच मनुष्य तो काय आहे हे सांगू शकत नाही. पण कधी तरी तो काय नाही आहे हे मात्र निश्चितपणे सांगू शकतो.प्रत्येक जणांना तो मनुष्य हवाय की जो त्याच्या निष्कर्षाप्रती पोहोचलाय. हजारो आवाज त्याला सांगत असतात की त्यांने काय शोधलंय आणि तरी पण हे फक्त त्यालाच ठाऊक असतं की त्याला काहीच गवसलेलं नाहीय. लोकांना असंच बोलू द्यावं आणि त्याने शोध तसाच चालू ठेवावा का? निश्चितच .पण कधी कधी त्याने स्वतःचं समर्थन करायला हवंय. मलाच ठावूक नाहीय की मी काय शोधतो आहे मी सावधचीत्ताने त्याला नाव देतो, मी माझी विधाने मागे घेतो, मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, मी पुढे जातो अन परत मागे फिरतो.तरी पण लोकांचा असा आग्रह असतो कि मला माझं अविष्करण ओळखता येतं.

Wednesday, 26 October 2011

सार्त्रची मळमळ

 मला नेमकं आठवतंय जेंव्हा मी सार्त्रची " नॉसीअ" वाचली होती.मी तिशीचा होतो आणि साल होतं १९६८.पॅरीस मध्ये उठावाची सुरुवात झाली होती आणि सार्त्र कामगार आणि विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी रस्त्यावर उतरला होता.तेंव्हा जगाच्या दुसरया टोकाला मी सिडनी मध्ये रात्रपाळीचा वॉचमन होतो. मे दिनाला  दंगे सुरु होण्यापूर्वी ५ दिवस आधी म्हणजे  २५ एप्रिलला उठावाची कुठलीच
 कल्पना नसताना  कैफ आणणाऱ्या अस्तित्ववादाच्या जगात मी उडी घेतली. फक्त आणि फक्त तत्वज्ञानविषयक कादंबऱ्या  लिहिण्यासाठी  मी  साधारण प्राप्ती करून देणारा फौजदारी वकिलीचा व्यवसाय  सोडला.सार्त्र जिथे भाषणे देत होता तेथील फक्त रस्त्यावरील दंग्याच्या  मोघम बातम्याच इथपर्यंत पोहोचत होत्या. आता माझी भूक मला सुस्पष्टपणे जाणवत होती एक महिना उलटूनही माझी कमाई शून्यच होती.त्यावेळी मार्गदर्शन घेण्यासाठी कुणीच न्हवतं, कॉलीन विल्सन सोडल्यास,
 ज्याची "आउटसायडर " मी एकाच बैठकीत अधाश्यासारखी वाचून काढली. त्याची चेक लिस्ट वाचताना माझी जाँ पॉल सार्त्रशी  ओळख झाली.

जणू काही मी स्वप्नातल्या नव्या जगात प्रवेश करत होतो. मला नेहमीच लेखक व्हावं असं वाटायचं. आणि आता मला एक असा मनुष्य सापडला होता की जो लेखक होता आणि तत्वज्ञानी पण होता. हॉटेल चे संडास आणि लोकांच्या वान्तीने भरलेले, तुंबून गेलेले  बाथरूम साफ करायचं काम करून घरी येत असताना संध्याकाळच्या शांत वेळी " नॉसीअ"ने मला व्यापून टाकलेलं असे. माझं रोजचं काम आणि पुस्तक ह्यामध्ये अफलातून विरोधाभास होता. मी दोन समांतर विश्वात  जगण्याचा प्रयत्न करीत असतानाच हळू हळू ते एकत्र होत गेले.सार्त्रच्या कल्पित कादंबरीतील व्यक्ती मी आजूबाजूला शोधू लागलो.सिडनीच्या जॉर्ज रस्त्यावर एक कॉफी शॉप होतं. तिथे एक वेटर असायचा त्याला असं वाटायचं की अजून सुद्धा तो प्राचीन ग्रीकच्या काँस्टीटयूशन स्क्वेयर मध्ये ओउझो सर्व्ह करतो आहे. मी त्याच्या सवयी हळूच एका पिवळ्या  वहीत टिपून घ्यायचो जेणेकरून  मी त्याला माझ्या कादंबरीमधील पात्र  करू शकेन खरं म्हणजे सार्त्रच्या सुप्रसिद्ध गॅर्सोन  प्रमाणे.
आता माझी एक गर्ल फ्रेंड होती. आम्ही दोघांच्या रात्रपाळी नंतर भेटायचो. ती  देखील काही साहित्य वाचत असावी. तिचं नाव जुलीएट होतं. मी तिच्यासाठी कविता लिहायचो-- ती सुंदर होती.--आम्ही बोंडी बीचवर जीवनातील  रहस्याविषयी बोलत  वीकेंड  व्यतीत करायचो . तिला दोस्तोव्हस्की च्या कादंबऱ्या आवडायच्या मग मीही काही काळ रस्कोल्निकोवची भूमिका करायचो. मला वाटतं हेच माझं पाहिलं वास्तववादी नातं होतं. माझ्या काल्पनिक विश्वात जिथे कुऱ्हाडीने खून करणारे खुनी होते तिथे रमणं धोकादायक होतं.अखेरीस असा परमोच्च बिंदू येणार होता  की जो तिच्यामाझ्या वस्तुस्थितीच्या कड्यावर डुगडुगणार  होता.मला सार्त्रची एक स्त्री व्यक्तीरेखा आठवली की जी  स्वतःचं कौमार्य कोणालाच बहाल करत नसते.मला वाटतं जुलीएट बाबत मी अजून थोडा आत्मसंयम ठेवायला हवा होता पण आम्ही त्या उत्कट संबंधामध्ये एवढे गुंतून गेलो की मी वकिली सोडायची  ठरवलं व प्रेम आणि साहित्य यांच्यामध्ये विरंगुळा शोधू लागलो.

सुट्टीच्या दिवशी मी जुलीएटला भेटायचो , आम्ही वॅटसन समुद्र किनारी असणाऱ्या कॅफे मध्ये बसून अस्तित्वावादावर बोलायचो. ह्या प्रांतात ती माझ्या आधीच पोहोचली  असल्यामुळे ती एक प्रकारे माझी गुरु आणि मार्गदर्शिका होती. प्रत्येक रात्री मी कामावर जायचो  तो अंमळ सार्त्रच्या लेफ्ट बँक कॅफे मधील  रोबोटिक वेटरसारखा आणि यांत्रिक  पणे तेथील काम उरकायचो. पिवळ्या पानांचा गठ्ठा वाढतच गेला कारण कि माझ्या विचित्र हस्ताक्षराच्या गीचामिडीने आयुष्याचा एक टप्पाच भरून गेला आणि बहुधा तो संस्मरणीय असावा. मी नवनवीन क्षितिजे पालथी घातली आणि मला कळून चुकलं की मनुष्यावर स्वातंत्र्याची शिक्षा लादण्यात आली आहे.  मी पत्नीला सोडलं होतं, वकिली सोडली होती आणि मी जुलीएट वर प्रेम केलं.मी स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याएवढा  कोडगा झालो होतो आणि त्याचे सर्व दूरगामी परिणाम भोगण्यास देखील.

दुर्दैवाने मी अजूनसुद्धा विवाहित होतो आणि हार्बरचे चमचमणारे दिवे दिसणाऱ्या डबल बे अपार्टमेंट पर्यंत, एका संध्याकाळी माझ्या बायकोने आमचा पाठलाग केला.फुटलेल्या काचांच्या आवाजाचं भविष्य होतं की मी त्रयस्थपणे अप्सरांचे युद्ध पाहावे आणि बायकोला डोळ्याच्या किंचित खाली घुसलेल्या काचेच्या तुकड्यामुळे हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं. असं जोखमीचे संबंध असणारं जीवन  तिच्यासाठी न्हवतं. तिने एका वकिलाशी लग्न केलं होतं  आणि तिला मध्यमवर्गीय सदाचार अपेक्षित होता न की अस्तित्ववादी परीवेदना.जुलीएट आणि माझे अति उष्ण संबंध एकच वर्ष टिकले. तो पर्यंत  मी बहुधा सर्वच अस्तित्ववादी साहित्य वाचलं होतं.किर्केगार्दच्या "सीड्यूसर्स  डायरीचा" तर मी बंदिवानच
 झालो आणि मला खात्री आहे कि लहान सार्त्रवर त्याच्या संस्कारक्षम वयात ह्या डायरीचा प्रभाव पडला असणार आहे.आता मला दिसतं की " नॉसीअ" हा त्याचा आदर्श जग आणि इंद्रियगोचर
 जग ह्यामधील परस्परविरोध दाखविण्याचा प्रयत्न आहे.

त्याच्या पुस्तकात " डायरी लिहित रहा"  असा वाचकाला पहिल्याच वाक्यात उपदेश केला आहे.
सिडनीच्या हार्बर ब्रिज च्या पलीकडे असणारया रेल्वेच्या उड्डाणपुलाखाली माझ्या गुहेत , रात्रीच्या गडद अंधारात गीचामिडत आत आत खोल वर जाताना विचित्र संकीर्ण विचारांचं मोहोळ
 माझ्या मनात उठत होतं. मी  पिवळ्या कागदांवर लिहित असे, जे खूप काळ मी जपून ठवले होते ह्या विचारांनी कि कधीतरी मी ते परत  संगतवार लिहून काढेन.पण अशी संधी कधीच आली नाही  कारण मी युरोपमध्ये आलो आणि दुसरयाच एका विषयावर लक्ष केंद्रित केलं--तो म्हणजे अटलांटीस.
अजून देखील मी मला पाहू शकतो, कागदावर स्थिरपणे पेन रोखलेला जणू काही दोस्तोव्हस्कीच्या अंडरग्राउंड  मॅन सारखा किंवा काफ्काच्या "के" सारखा, आयुष्याच्या छोट्या अद्भुत भागावर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करताना जे माझ्या दृष्टीने त्यावेळी फार मोलाचं न्हवतं. पण मग हि तत्वज्ञानाची पुस्तक मला दिसली. हा अमूल्य ठेवा  होता जो मला अभेद्य अशा अबोध भयाच्या चक्रव्यूहातून पार घेऊन गेला. मी " नॉसीअ" कोळून  प्यायलो होतो  आणि माझ्या अपरिचित भूमिगत जीवनाच्या  माध्यमातून  ह्या मार्गदर्शिकेत  मला एक पॅसेज  सापडला. मी अस्तित्ववादी निर्वेदनाच्या विरल बर्फाच्या थरावर पहिलं  पाऊल ठेवलं.  विश्वाच्या तळाशी उलट पालटा  होऊन मी जगत होतो जिथे मी शेवटी स्वतंत्र होण्याचं धाडस दाखविलं होतं.
लेखक -Colin Amery