स्वैर कल्पनेच्या उच्चतम चेतनामय अवस्थेमध्ये गणितीय प्रात्यक्षिकाच्या संपूर्ण आवेगाने त्याला आत्मज्ञान झाले की जीवन हे अर्थहीन आहे त्यावेळी त्याने अशी कल्पना केली की ;म्हणूनच क्रोंशोवने पर्शिअन गालीचा दिला असावा. विणकराने गुंतागुंतीचा नक्षीदार रचनेचा आकृतिबंध विणला होता तो एकमात्र त्याच्या सौंदर्य सदभिरुचीदर्शक सुखासाठी न की कोणत्या अंतिम हेतू प्रीत्यर्थ ; मनुष्य पण असाच जीवन व्यतीत करू शकणार नाही काय? जर एखाद्यला असा कुत्रिम विश्वास वाटला की त्याच्या कर्मावर त्याचे नियंत्रण नाहीय तर तो मनुष्य देखील; त्याच्या जीवनाकडे पाहून; त्याला अशी अनुभूती होणार नाही काय की एक अत्यंत शोभिवंत नक्षीदार आकृतिबंध तयार झाला आहे. ह्या रचनेची किंचितच गरज आहे आणि त्याची आवश्यकता काहीच नाही. ते त्याने केवळ स्वान्त सुखाय केलंय. त्याच्या जीवनातील बहुउन्मार्गी घटना , त्याची कर्त्यव्यपूर्ती, त्याच्या भावना, त्याचे विचार, तो एक संकल्पन तयार करू शकतो , साधारण, अलंकारयुक्त ,जटील किंवा मनोहर , यद्यपि निर्वाचानाचे सामर्थ्य हे एक इंद्रजाल देखील असू शकेल, जरी अस्पष्ट चंद्रकिरण आणि प्रत्यक्ष यांची विस्मयकारक हस्तलाघवाने केलेली ती एक अद्भुत गुंफण असू शकेल, असं वाटत होतं आणि त्याच्यासाठी हे असंच होतं जीवनाच्या विस्तीर्ण विकृतीमध्ये ( एक नदी जिचा कोणताही उगम नाही आणि अंतहीन असं तिचा प्रवाह जिथे सागर नाही ) सर्व अर्थहीन आहे आणि काहीच महत्वाचं नाहीय या त्याच्या कल्पनेच्या पार्श्वभूमीवर, नक्षीदार आकृतीबंध विणण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगीत धाग्याचे निर्वाचन करण्याचे आत्मसापेक्ष समाधान एखाद्या मनुष्याला मिळणार नाही काय?. असा एक नक्षीदार आकृतीबंध आहे जो की , उघडपणे निःसंदिग्ध आहे , परिपूर्ण आहे, आणि अत्यंत सुंदर आहे ज्यामध्ये मनुष्य जन्मतो, मोठा होतो, विवाह करतो, मुले जन्माला घालतो, पोटाची खळगी भरण्यासाठी परिश्रम करतो आणि मरतो; परंतु बाकीचे ही आहेत, बिकट, किचकट, सूक्ष्म गुंतागुंतीचे आणि विलक्षण ज्यामध्ये सुखाचा अभाव आहे आणि जिथे यशासाठी प्रयासच केले गेले नाहीत ; आणि त्यामध्ये क्षुब्ध मोहकता आढळून येऊ शकेल.काहींचं जीवन; जसं की हेवर्डचं, आकृतिबंध अपरिपूर्ण असतानाच अंध- तटस्थ यदृच्छा खंडित झाली ;अन सांत्वनेच्या सुखाबद्दल तर उदासीनताच होती; बाकींचे जीवन; जसं की क्रोंशावचं, त्याने असा आकृतिबंध तयार केला की तो समजण्यास कठीण आहे, त्याचं आयुष्यच त्याचं समर्थन होतं हे समजण्यास दृष्टीकोन बदलायला हवा होता आणि प्राचीन मानदंडात फेरफार करायला हवे होते .त्याला असं वाटलं की तो सुखासाठी इच्छेचा त्याग ह्या त्याच्या शेवटच्या दृष्टीभ्रमाचा अंत करीत आहे. सुखाच्या फुटपट्टीने त्याचे जीवन मोजले असते तर ते खूपच निष्टुर ठरले असते. पण आता त्याच्यामध्ये विश्वास यायला लागला जेंव्हा त्याला आकलन झाले की जीवन मोजायला, त्याची किंमत करायला दुसरे काही हवे होते. सुख हे एक वेदने प्रमाणे आहे. ते येतात , दोघे पण जसे जीवनाचे बाकीचे तपशील येतात, नक्षीदार आकृतीबंध विस्तारताना. एका क्षणी त्याला असं भासलं की तो अस्तित्वाच्या आकस्मिक घटनांकडे तटस्थेने पाहतोय अन त्याला अशी जाणीव झाली की पूर्वीप्रमाणे त्या घटना पुन्हा त्याला प्रभावित करणार नाहीत. काहीही घडलं तरी आता ती फक्त अजून एक प्रेरणा असली असती; नक्षीदार आकृतीबंध आणखीन जटील होण्याकरिता आणि जेंव्हा अंत समीप येईल तेंव्हा कार्यसिद्धीचा तो आनंद घेईल. ही एक कलावस्तू आहे अन ती खचितच सुंदर असेल कारण तिच्या अस्तित्वाविषयी फक्त त्यालाच जाणीव आहे अन त्याच्या मृत्युनंतर या कलावस्तूचे अस्तित्व देखील संपुष्टात येईल.
तो आनंदित झाला.
तो आनंदित झाला.
Best!!
ReplyDelete