सभोवतालच्या प्रदेशात सूर्याच्या उबेशीर पिवळ्या धमक किरणांच्या तरंगांची वृष्टी होत आहे. त्यांच्या प्रभावाखाली सर्व काही अक्षुब्धपणे वाढत राहते, आणि लुबेरोन पर्वत , त्या तिथला, केवळ मौनाचा एक विशाळ खंड, ज्याला मी अविरतपणे ऐकत राहतो. मी सावध चित्ताने ऐकतो, कोणी दूरवरून माझ्याकडे धावत येत आहे, अदृश्य मित्र मला बोलावत आहेत. माझा हर्ष वाढतो आहे.आणि पुन्हा एकदा गूढ आनंदी रहस्याचे मला सर्वंकष आकलन होते.
तर मग ह्या विश्वातील अतार्किकता कुठे आहे?हे दैदिप्यमान तेज आहे की त्याच्या उणीवेची आठवण? स्मरणात इतके कोवळे मस्त उन असताना मी निरर्थक गोष्टींवर पैजा कश्या लावत बसलो? कधी कधी माझ्या भोवतीचे लोक आश्चर्यचकित होतात आणि मी देखील. मी त्यांना सांगू शकतो जसा मी स्वतःलाच सांगतो असतो की खरं तर सूर्य किरणांमुळेच मला ती वाट दिसू शकली आणि त्याचा गडद प्रकाश, विश्व आणि त्याच्या विविध स्वरूपाला नेत्रदीपक तिमिरात साकळवून टाकतो. परंतु हेच आणखीन भिन्न आणि सुलभ शब्दांमध्ये देखील व्यक्त करता येईल अन मला ते आवडेलच. सत्य हे नेहमीच स्पष्ट अन स्वच्छह स्वरूपात प्रकट व्हावयास हवे असं मला वाटतं अन खरं म्हणजे तेच सत्याचे लक्षण आहे. अतार्किकता , मला त्या बद्दल काय वाटते जे मला कोणाही पेक्षा निःसंदेह पणे सूक्ष्म भेदही न करता साध्या सोप्या अन सरळ भाषेत विवरण करता येईल. जर वास्तविकपणे तसंच सांगायचं झालं तर निश्चितपणे पुन्हा आपल्याला सूर्याकडेच परतावे लागेल.
कोणताच मनुष्य तो काय आहे हे सांगू शकत नाही. पण कधी तरी तो काय नाही आहे हे मात्र निश्चितपणे सांगू शकतो.प्रत्येक जणांना तो मनुष्य हवाय की जो त्याच्या निष्कर्षाप्रती पोहोचलाय. हजारो आवाज त्याला सांगत असतात की त्यांने काय शोधलंय आणि तरी पण हे फक्त त्यालाच ठाऊक असतं की त्याला काहीच गवसलेलं नाहीय. लोकांना असंच बोलू द्यावं आणि त्याने शोध तसाच चालू ठेवावा का? निश्चितच .पण कधी कधी त्याने स्वतःचं समर्थन करायला हवंय. मलाच ठावूक नाहीय की मी काय शोधतो आहे मी सावधचीत्ताने त्याला नाव देतो, मी माझी विधाने मागे घेतो, मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, मी पुढे जातो अन परत मागे फिरतो.तरी पण लोकांचा असा आग्रह असतो कि मला माझं अविष्करण ओळखता येतं.
No comments:
Post a Comment