मला नेमकं आठवतंय जेंव्हा मी सार्त्रची " नॉसीअ" वाचली होती.मी तिशीचा होतो आणि साल होतं १९६८.पॅरीस मध्ये उठावाची सुरुवात झाली होती आणि सार्त्र कामगार आणि विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी रस्त्यावर उतरला होता.तेंव्हा जगाच्या दुसरया टोकाला मी सिडनी मध्ये रात्रपाळीचा वॉचमन होतो. मे दिनाला दंगे सुरु होण्यापूर्वी ५ दिवस आधी म्हणजे २५ एप्रिलला उठावाची कुठलीच
कल्पना नसताना कैफ आणणाऱ्या अस्तित्ववादाच्या जगात मी उडी घेतली. फक्त आणि फक्त तत्वज्ञानविषयक कादंबऱ्या लिहिण्यासाठी मी साधारण प्राप्ती करून देणारा फौजदारी वकिलीचा व्यवसाय सोडला.सार्त्र जिथे भाषणे देत होता तेथील फक्त रस्त्यावरील दंग्याच्या मोघम बातम्याच इथपर्यंत पोहोचत होत्या. आता माझी भूक मला सुस्पष्टपणे जाणवत होती एक महिना उलटूनही माझी कमाई शून्यच होती.त्यावेळी मार्गदर्शन घेण्यासाठी कुणीच न्हवतं, कॉलीन विल्सन सोडल्यास,
ज्याची "आउटसायडर " मी एकाच बैठकीत अधाश्यासारखी वाचून काढली. त्याची चेक लिस्ट वाचताना माझी जाँ पॉल सार्त्रशी ओळख झाली.
जणू काही मी स्वप्नातल्या नव्या जगात प्रवेश करत होतो. मला नेहमीच लेखक व्हावं असं वाटायचं. आणि आता मला एक असा मनुष्य सापडला होता की जो लेखक होता आणि तत्वज्ञानी पण होता. हॉटेल चे संडास आणि लोकांच्या वान्तीने भरलेले, तुंबून गेलेले बाथरूम साफ करायचं काम करून घरी येत असताना संध्याकाळच्या शांत वेळी " नॉसीअ"ने मला व्यापून टाकलेलं असे. माझं रोजचं काम आणि पुस्तक ह्यामध्ये अफलातून विरोधाभास होता. मी दोन समांतर विश्वात जगण्याचा प्रयत्न करीत असतानाच हळू हळू ते एकत्र होत गेले.सार्त्रच्या कल्पित कादंबरीतील व्यक्ती मी आजूबाजूला शोधू लागलो.सिडनीच्या जॉर्ज रस्त्यावर एक कॉफी शॉप होतं. तिथे एक वेटर असायचा त्याला असं वाटायचं की अजून सुद्धा तो प्राचीन ग्रीकच्या काँस्टीटयूशन स्क्वेयर मध्ये ओउझो सर्व्ह करतो आहे. मी त्याच्या सवयी हळूच एका पिवळ्या वहीत टिपून घ्यायचो जेणेकरून मी त्याला माझ्या कादंबरीमधील पात्र करू शकेन खरं म्हणजे सार्त्रच्या सुप्रसिद्ध गॅर्सोन प्रमाणे.

आता माझी एक गर्ल फ्रेंड होती. आम्ही दोघांच्या रात्रपाळी नंतर भेटायचो. ती देखील काही साहित्य वाचत असावी. तिचं नाव जुलीएट होतं. मी तिच्यासाठी कविता लिहायचो-- ती सुंदर होती.--आम्ही बोंडी बीचवर जीवनातील रहस्याविषयी बोलत वीकेंड व्यतीत करायचो . तिला दोस्तोव्हस्की च्या कादंबऱ्या आवडायच्या मग मीही काही काळ रस्कोल्निकोवची भूमिका करायचो. मला वाटतं हेच माझं पाहिलं वास्तववादी नातं होतं. माझ्या काल्पनिक विश्वात जिथे कुऱ्हाडीने खून करणारे खुनी होते तिथे रमणं धोकादायक होतं.अखेरीस असा परमोच्च बिंदू येणार होता की जो तिच्यामाझ्या वस्तुस्थितीच्या कड्यावर डुगडुगणार होता.मला सार्त्रची एक स्त्री व्यक्तीरेखा आठवली की जी स्वतःचं कौमार्य कोणालाच बहाल करत नसते.मला वाटतं जुलीएट बाबत मी अजून थोडा आत्मसंयम ठेवायला हवा होता पण आम्ही त्या उत्कट संबंधामध्ये एवढे गुंतून गेलो की मी वकिली सोडायची ठरवलं व प्रेम आणि साहित्य यांच्यामध्ये विरंगुळा शोधू लागलो.
सुट्टीच्या दिवशी मी जुलीएटला भेटायचो , आम्ही वॅटसन समुद्र किनारी असणाऱ्या कॅफे मध्ये बसून अस्तित्वावादावर बोलायचो. ह्या प्रांतात ती माझ्या आधीच पोहोचली असल्यामुळे ती एक प्रकारे माझी गुरु आणि मार्गदर्शिका होती. प्रत्येक रात्री मी कामावर जायचो तो अंमळ सार्त्रच्या लेफ्ट बँक कॅफे मधील रोबोटिक वेटरसारखा आणि यांत्रिक पणे तेथील काम उरकायचो. पिवळ्या पानांचा गठ्ठा वाढतच गेला कारण कि माझ्या विचित्र हस्ताक्षराच्या गीचामिडीने आयुष्याचा एक टप्पाच भरून गेला आणि बहुधा तो संस्मरणीय असावा. मी नवनवीन क्षितिजे पालथी घातली आणि मला कळून चुकलं की मनुष्यावर स्वातंत्र्याची शिक्षा लादण्यात आली आहे. मी पत्नीला सोडलं होतं, वकिली सोडली होती आणि मी जुलीएट वर प्रेम केलं.मी स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याएवढा कोडगा झालो होतो आणि त्याचे सर्व दूरगामी परिणाम भोगण्यास देखील.
दुर्दैवाने मी अजूनसुद्धा विवाहित होतो आणि हार्बरचे चमचमणारे दिवे दिसणाऱ्या डबल बे अपार्टमेंट पर्यंत, एका संध्याकाळी माझ्या बायकोने आमचा पाठलाग केला.फुटलेल्या काचांच्या आवाजाचं भविष्य होतं की मी त्रयस्थपणे अप्सरांचे युद्ध पाहावे आणि बायकोला डोळ्याच्या किंचित खाली घुसलेल्या काचेच्या तुकड्यामुळे हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं. असं जोखमीचे संबंध असणारं जीवन तिच्यासाठी न्हवतं. तिने एका वकिलाशी लग्न केलं होतं आणि तिला मध्यमवर्गीय सदाचार अपेक्षित होता न की अस्तित्ववादी परीवेदना.जुलीएट आणि माझे अति उष्ण संबंध एकच वर्ष टिकले. तो पर्यंत मी बहुधा सर्वच अस्तित्ववादी साहित्य वाचलं होतं.किर्केगार्दच्या "सीड्यूसर्स डायरीचा" तर मी बंदिवानच
झालो आणि मला खात्री आहे कि लहान सार्त्रवर त्याच्या संस्कारक्षम वयात ह्या डायरीचा प्रभाव पडला असणार आहे.आता मला दिसतं की " नॉसीअ" हा त्याचा आदर्श जग आणि इंद्रियगोचर
जग ह्यामधील परस्परविरोध दाखविण्याचा प्रयत्न आहे.
त्याच्या पुस्तकात " डायरी लिहित रहा" असा वाचकाला पहिल्याच वाक्यात उपदेश केला आहे.

सिडनीच्या हार्बर ब्रिज च्या पलीकडे असणारया रेल्वेच्या उड्डाणपुलाखाली माझ्या गुहेत , रात्रीच्या गडद अंधारात गीचामिडत आत आत खोल वर जाताना विचित्र संकीर्ण विचारांचं मोहोळ
माझ्या मनात उठत होतं. मी पिवळ्या कागदांवर लिहित असे, जे खूप काळ मी जपून ठवले होते ह्या विचारांनी कि कधीतरी मी ते परत संगतवार लिहून काढेन.पण अशी संधी कधीच आली नाही कारण मी युरोपमध्ये आलो आणि दुसरयाच एका विषयावर लक्ष केंद्रित केलं--तो म्हणजे अटलांटीस.

अजून देखील मी मला पाहू शकतो, कागदावर स्थिरपणे पेन रोखलेला जणू काही दोस्तोव्हस्कीच्या अंडरग्राउंड मॅन सारखा किंवा काफ्काच्या "के" सारखा, आयुष्याच्या छोट्या अद्भुत भागावर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करताना जे माझ्या दृष्टीने त्यावेळी फार मोलाचं न्हवतं. पण मग हि तत्वज्ञानाची पुस्तक मला दिसली. हा अमूल्य ठेवा होता जो मला अभेद्य अशा अबोध भयाच्या चक्रव्यूहातून पार घेऊन गेला. मी " नॉसीअ" कोळून प्यायलो होतो आणि माझ्या अपरिचित भूमिगत जीवनाच्या माध्यमातून ह्या मार्गदर्शिकेत मला एक पॅसेज सापडला. मी अस्तित्ववादी निर्वेदनाच्या विरल बर्फाच्या थरावर पहिलं पाऊल ठेवलं. विश्वाच्या तळाशी उलट पालटा होऊन मी जगत होतो जिथे मी शेवटी स्वतंत्र होण्याचं धाडस दाखविलं होतं.
लेखक -Colin Amery